*गावातच दुधबिले मिळण्यासाठी केडीसीसी बसविणार मायक्रो एटीएम सेवा……*
*कोल्हापूर, दि.३०:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये बँकेकडून दूध वाढीसाठी गोकुळ दूध संघाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या ५०० कोटी रुपये अर्थपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा व माहितीची देवाणघेवाण झाली. गोकुळ दूध संघात सत्ता बदल होताच दूध वाढीसाठी ५०० कोटी रुपये अर्थपुरवठा करणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्या अनुषंगाने या सविस्तर चर्चा झाली.*
*बैठकीत गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांचा बँकेच्यावतीने सत्कार झाला.*
*यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची प्रक्रिया, व्यक्तिगत कर्जपुरवठा माहिती, दूध बिल वितरण प्रक्रिया या विषयांवर चर्चा झाली.*
*यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्यासह, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बी. आर. पाटील, श्री. तुरंबेकर, चार्टर अकाउंटंट श्री. माने, तसेच केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक पांडुरंग रावण, व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक दिलीप ढोबळे, अकाउंट्स विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप आदी उपस्थित होते.*