कोल्हापूर ता.30 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे व आर्थीक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादीत राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नागरीकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
महानगरपालिकेने मंजूर धोरणानुसार दिनांक 30 जून 2021 अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये 30 जून अखेर 6% सवलत देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांचे आर्थिक उत्पनाचे साधन मर्यादीत राहिल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होत आहे. त्यामुळेच नागरीकांना दिलास देण्याबरोबरच कर भरण्यास प्रोत्साहन करण्यासाठी 31 जुलै पर्यंत 6% सवलतीस मुदतवाढ दिलेली आहे. यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी प्रशासकीय दफ्तरीय ठराव क्रं.161, दि.30 जून 2021 च्या ठरावानुसार सवलतीचा निर्णय घेतलेला आहे.