कोल्हापूर ता.01: शनिवार दि.03 जुलै 2021 रोजी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत 60 वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सीनच्या पहिला डोस देण्यात येणार आहे. या ठिकाणी ज्यांचे कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेवून 28 दिवस पुर्ण झाले आहे अशा 45 वर्षावरील पात्र नागरीकांनाही कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. पुरेशी लस उपलब्ध नसलेणे शुक्रवार, दिनांक 2 जुलै 2021 रोजी सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे. शनिवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदरबाजार, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर येथे 60 वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सीनच्या पहिला डोसचे लसीकरण सुरू राहणार आहे. तसेच घराजवळील लसीकरण मोहिमेअंतर्गत न्यु शाहूपुरी सासने मैदान जवळील हॉटेल कृष्णा इन येथे 60 वर्षे व त्यावरील नागरिकांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात येणार आहे.