कोल्हापूर, दि. 1: कामगार विभाग तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन व बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रशासकीय सोईच्या दृष्टीने मार्केट यार्ड, कोल्हापूर या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.