इचलकरंजी प्रतिनिधी : शहरातील शाहु कॉर्नर येथे एका स्कॉर्पिओ गाडीतून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू , पानमसाला गुटख्याची वाहतुक होत असताना २ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.या प्रकरणी इजाजअली आशरफअली कित्तूर रा.विक्रमनगर याला अटक करण्यात आली.
ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजणेच्या दरम्यान गावभाग पोलीसांनी केली असून जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ५१ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला,गुटखा असा माल कर्नाटकातून शहरात आणन्यात येत असताना शाहु कॉर्नर येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालामध्ये स्कॉर्पिओ व मोबाईल हैंडसेटचा समावेश आहे.
सहा.पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार यांच्या नेत्रुत्वाखालील पथकाने ही कारवाई करण्यात आली.