कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या कोरोनाच्या संकटकाळात प्रथम आघाडीवर लढणाऱ्या व कोविड केअर सेंटरला सेवा देणाऱ्या डॉक्टर कोविड योद्धा यांचा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जीपीए अध्यक्षा डॉक्टर उषा निंबाळकर सेक्रेटरी महादेव जोगदंडे, डॉ. वर्षा पाटील डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. पूजा पाटील,डॉ. शिवराज जितकर, इनरविल क्लबच्या अध्यक्षा वर्षा चौगुले, सेक्रेटरी गीता कदम, कविता बेनाडे, सुवर्णा गांधी व अंजली देढिया आदी उपस्थित होते.