नावनोंदणी १५ जुलेपर्यंत करावी
कोल्हापूर, ता. १ ः सध्या कोरोनाचे संकट सगळीकडेच आहे. राज्यात तर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. यासाठी कोल्हापुरातील समाजमन सामाजिक संस्थेतर्फे लवकरच रक्तदान शिबिर भरविण्यात येईल. या शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थाध्यक्ष महेश गावडे यांनी केले आहे.
राज्याची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून, सध्या केवळ २० हजार पिशव्याच रक्त शिल्लक आहे. कोरोनाच्या काळात तर रक्ताची अधिक गरज असते. यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर करावी. महेश गावडे- ९८२३७६७८५८, जगदीश खोडके- ९८५०९५७६२४, बाळासाहेब उबाळे- ९३२५४०३२१३, सतीश वडणगेकर- ९८५००४५५३७. रक्तदान शिबिराची तारीख, वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.