संजय गांधी योजनेचे मंजुरी पत्रे वाटप
:प्रतिनिधी-दक्षिण मतदार संघातील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष कांबळे यांचे कार्य आदर्श आहे. तळागाळातील वंचितासाठी करत असलेले समाजकार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन
करवीरचे मा.सभापती प्रदिप झांबरे यांनी केले.उंचगाव (ता. करवीर) येथे संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्राचे वाटप प्रसंगी बोलत होते.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी. श्रावणबाळ. योजनाच्या मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री सतेज पाटील,आमदार ॠतुराज पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर दक्षिण संजय गांधी समिती सदस्य संतोष कांबळे यांच्या प्रयत्नातुन मंजुरी झालेल्या उंचगाव,गांधीनगर, सरनोबतवाडी,नेर्ली,उजळाईवाडी,येथील लाभार्थी यांना मंजुरी पत्राचे वाटप करवीरचे मा सभापती.प्रदिप झांबरे, माजी उपसभापती सुनिल पोवार,उंचगाव सरपंच मालुताई काळे,माजी सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना करवीरचे माजी उपसभापती सुनिल पोवार म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील मार्गदर्शनाखाली संजय गांधी कमिटीचं काम उत्कृष्टपणे सुरू आहे
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवि काळे,दिनकर पोवार,शुभम चौगुले, आकाश लोहार व लाभार्थी उपस्थित होते.