कोल्हापूर :रोटरी मिडटाउन तर्फे आज डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश संघवी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध विषयावर चर्चा झाली कोरोना ची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं मत गेले काही दिवस वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ करत आहेत त्यामुळे डॉक्टर्स मंडळींनी तिसर्या लाटेशी सामना करण्यासाठी सज्ज रहावं असं आवाहन डॉक्टर प्रकाश संघवी यांनी केल डॉक्टर हा घटक हजारो वर्षापासून समाजाचा अविभाज्य घटक आहे यातूनच आपल्याला रोटरीच्या माध्यमातून समाजाची पर्यायाने मानवतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं डॉक्टर संघवी यांनी नमूद केलं यावेळी रोटरी मीडटाउनच्या अध्यक्षा भारती नायक यांनी रोटरी आणि डॉक्टर्स यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रीतम शहा यांनी डोळ्यांच्या मोफत उपचार या संबंधीची माहिती दिली तर डॉक्टर वासंती पाटील कान नाक घसा तज्ञ यांनी मकयूकरमायक्रोसिस संबंधित माहिती दिली यावेळी सचिव डॉक्टर मीरा कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षे आपण पोलिओ निर्मूलनासाठी लढा दिला त्याच पद्धतीने कोरोना मुक्तीचा लढा लढण्या संबंधी कार्यरत राहून त्यावर विजय मिळवावा अस आवाहन केलं यावेळी डॉक्टर करुणाकर नायक सचिन लाड नरेन पाटील देवयानी चव्हाण डॉक्टर सचिन शिंदे मारुती पवार डॉक्टर दिग्विजय पाटील सीए विवेक भावसार रितू वायचळ नितेश मणियार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते