कोल्हापूर ता.25 :- कोल्हापूर शहरात पूराचे पाणी ओसरत असून पूर आलेल्या भागात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पुराचे पाणी कमी झालेल्या भागाची स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात आली. आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ही स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. ही स्वच्छता मोहिम सकाळच्या व दुपारच्या दोन सत्रात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 5 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.
शहरामध्ये पूराचे पाणी ओसरु लागलेने महापालिकेच्यावतीने पूराचे पाणी कमी झालेल्या भागामध्ये महास्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता मोहिमेचा 117 वा रविवार असून या अभियानामध्ये मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.
या स्वच्छता मोहिमेत शिरोली टोल नाका परिसर, सीता कॉलनी, भगवा चौक, कसबा बावडा, शाहूपुरी परिसर, व्हीनस कॉर्नर, सिद्धार्थनगर, फोर्ड कॉर्नर, पंचगंगा नदी परिसर, फुलेवाडी, दुधाळी परिसर, रमणमळा परिसर, धान्य गोडावन, गांधी मैदान, बावडा स्मशानभूमी, रामानंद नगर, सीता कॉलनी, तोरस्कर चौक, गणेश पार्क, लक्षीमीपुरी, कलेक्टर ऑफिस रोड, बापट कॅम्प परिसर, भाविक विठोबा मंदिर, लाईन बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी या परिसरातील पुराचे ओसलेल्या पाण्याच्या ठिकाणी करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत 5 जेसीबी, 10 डंपर, 2 आरसी गाडया, 2 औषध फवारणी पंप व 10 ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला. सदरची मोहिम महापालिकेच्या 550 सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, शिवाजी शिंदे, महेश भोसले, दिलीप पाटणकर, शुभांगी पोवार, करण लाटवडे, मनोज लोट, विकास भोसले, ऋषीकेश सरनाईक, श्रीराज होळकर, मुनीर फरास व कर्मचारी उपस्थित होते.