कोल्हापूर – कोल्हापुरसह संपूर्ण जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे.जिल्ह्यातील राधानगरी धरणात 141.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, तुळशी नदीवरील-बीड, वारणा नदीवरील-चिंचोली व माणगाव, कुंभी नदीवरील- कळे, मांडूकली, सांगशी व शेणवडे, कासारी नदीवरील- यवलूज, वेदगंगा नदीवरील- वाघापूर व निळपण, दुधगंगा नदीवरील- दत्तावाड, असे एकूण 22 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 58.68 दलघमी, वारणा 739.07 दलघमी, दूधगंगा 375.21 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 42.12 दलघमी, कुंभी 58.08 दलघमी, पाटगाव 73.89 दलघमी, चिकोत्रा 26.20 दलघमी, चित्री 38.72 दलघमी, जंगमहट्टी 17.01 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 19.70, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 28.10 फूट, सुर्वे 27.8 फूट, रुई 57 फूट, इचलकरंजी 53 फूट, तेरवाड 47.8 फूट, शिरोळ 36 फूट, नृसिंहवाडी 32.1 फूट, राजापूर 23 फूट तर नजीकच्या सांगली 9.9 फूट व अंकली 11.10 फूट अशी आहे. शिवाय जिल्ह्यातील 31 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आज (बुधवार) आणि दोन दिवस यापेक्षाही जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्याची पाणीपातळी जवळपास 30 फुटांपर्यंत पोहोचली असून एकूण 39 फूट ही इशारा पातळी आहे. तर 43 फूट इतकी धोका पातळी आहे. त्यामुळे सातत्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह, घाटमाथ्यावर धुवांधार पाऊस सुरू आहे. विशेष करून राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा, आजरा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी दुसऱ्यांदा ओलांडली.