महाराष्ट्र: एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स (एचडीएफसी एर्गो) या भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या जीवनेत्तर विमा कंपनीला भारत सरकारने रबी २०२१ हंगामासाठी अकोला, बीड, औरंगाबाद, परभणी, जालना, सांगली, लातूर, कोल्हापूर, सातारा, ठाणे व हिंगोली जिल्ह्यांमधील कर्जदार असलेल्या व नसलेल्या शेतक-यांकरिता रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्किम (आरडब्ल्यूबीसीआयएस)ची अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिले आहेत. रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्किम (आरडब्ल्यूबीसीआयएस) अंतर्गत सर्व उत्पादने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून मान्यताकृत आहेत.
उपरोक्त जिल्ह्यांसाठी योजनेअंतर्गत असलेली पीके आहेत आंबा व डाळिंब. विमाकृत राशी, शेतक-यांसाठी हप्ता, नोंदणीकरिता अंतिम तारीख यासंदर्भातील आरडब्ल्यूबीसीआयएस हंगामी धोक्यांपासून विमा संरक्षण देते, यामध्ये डेफिसिट रेनफॉल कव्हर (अपु-या पावसासंदर्भात विमा संरक्षण), कन्सेक्युटिव्ह ड्राय डे कव्हर (सतत येणा-या दुष्काळासंदर्भात विमा संरक्षण), रिलेटिव्ह ह्युमिडिटी कव्हर (आर्द्रतेसंदर्भात विमा संरक्षण) यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून हे अधिसूचित करण्यात आले आहे.
अकोला, बीड, औरंगाबाद, परभणी, जालना, सांगली, लातूर, कोल्हापूर, सातारा, ठाणे व हिंगोली जिल्ह्यांमधील शेतकरी जवळच्या आर्थिक संस्था- जसे राष्ट्रीयकृत बँक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पीएसीएस), प्रादेशिक ग्रामीण बँक / सामान्य सेवा केंद्र (सीएससी)च्या माध्यमातून किंवा अधिकृत एचडीएफसी एर्गो एजंट्सशी संपर्क साधत वर उल्लेख करण्यात आलेल्या पीकांसाठी आरडब्ल्यूबीसीआयएस अंतर्गत त्यांच्या पीकांसाठी विमा संरक्षण घेऊ शकतात. शेतकरी फार्मर्स अॅपवर देखील लॉगऑन करू शकतात किंवा https://pmfby.gov.in/farmerLogin या वेबसाइटवर योजनेमध्ये स्वत:हून नोंदणी करण्याच्या पर्यायाची निवड करू शकतात.