उजळाईवाडी पोलीस मदत केंद्राच्या वतीने महामार्ग मृत्युंजय दूतांना ओळखपत्र वाटप
गांधीनगर:प्रतिनिधी -:महामार्गावरील हायवे मृत्युंजय दूत हे पहिल्या तास- दीड तासात म्हणजेचं “गोल्डन हवर’ मध्ये जखमींना प्रथमोपचार मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी ते देवदूतांची भूमिका निभावत आहेत. माणुसकीच्या दुनियेतील हायवे मृत्युंजय दूतांचे समाजकार्य प्रेरणादायी आहे.असे मत उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी केले.
उजळाईवाडी पोलीस मदत केंद्राच्या वतीने राज्य वाहतूक महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या प्रेरणेतून महामार्ग मृत्युंजय दूत’ ही संकल्पना १ मार्च पासून सुरू आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राअंतर्गत १४६ मृत्युंजय दूत कार्यरत आहेत.त्यापैकी १२३ मृत्युंजय दूताची ओळखपत्र तयार होऊन १०३ मृत्युंजय दूतांना वाटप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा विषयी माहिती देण्यात येऊन प्रथोमोपचार बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे माजी प्रभारी प्राचार्य प्रशांत सालीयन ,सपोनि श्रीमती के. एस. नाईक,पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नलवडे,
पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शिरगुप्पी,पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. माळगे,पोलीस उपनिरीक्षक एम. एच. जिरगे, यांच्यासह सहाय्यक फॊजदार शंकर कोळी,ठाणे अंमलदार श्रीकांत शिंदे,ठाणे अंमलदार राहुल देसाई,ठाणे अंमलदार भरत कांबळे, यासह पोलीस कर्मचारी विशाल बद्रे,राहुल महाजन,विजय कोळी,सुरजित माने,तात्यासो मुंडे,संदीप पाटील,सर्जेराव पाटील,अझरउद्दीन खतीब,आशिष कोळेकर,तौसिफ मुल्ला,कारंडे सर, मृत्युंजय दूत मोहन सातपुते, किरण आडसूळ,संदीप संकपाळ यांचे सहकार्य लाभले. यावेळी मृत्युंजय दूत,उपस्थित होते.