कोल्हापूर, ता. ११ – भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल कदमवाडी यांनी समाजातील दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एक मूठ धान्य समाजासाठी हा उपक्रम राबवत असते.
याहीवर्षी मुख्याध्यापिका सौ. नसिमा रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखुशीने विद्यार्थ्यांनी धान्य देऊन या उपक्रमामध्ये खारीचा वाटा उचलला. सुमारे 200 किलो धान्य जमा करून ते धान्य अनिकेत- निकेतन बालगृह (अनाथाश्रम) पाण्याचा खजिना, कोल्हापूर या ठिकाणी देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.