कोल्हापूर, ता. ३१ – कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघातर्फे झालेल्या रक्तदान शिबिरात ८७ बॅग रक्तदान संकलन करण्यात आले.
कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघातर्फे सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गुजरी येथे झालेल्या या शिबिराला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना नियमांचे पालन करीत संजीवन ब्लड बॅंकेच्या सहयोगाने झालेल्या या शिबिरात ८७ बॅग रक्तदान संकलन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड,माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजेश राठोड, अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, सचिव मणिशंकर गुरानी, उपसचिव देवाशीष दिनोरिया, संचालक आशीष मंडल (तुफान), नंबकुमार जाना, राजकुमार गुच्छाईत, संदीप मंडल (झंटू), बपिदा भूनिया, जयपाल शामसुंदर, समीर पात्रा, नियामत शेख, हसन अली शेख, कुरबान शेख यांच्यासह सभासद उपस्थित होते.