कोल्हापूर , ७ फेब्रुवारी २०२२ : हिरो एचएफ डिलक्स या देशाच्या सर्वात किफायतशीर आणि सर्वात लोकप्रिय व परवडणा-या प्रवासी विभाग मोटरसायकलच्या ग्राहकांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या इव्हेण्ट दरम्यान प्रतिलिटर १०० किमीहून अधिक अंतराचा प्रभावी मायलेज संपादित केला आहे. एचएफ डिलक्सच्या रायडिंग क्षमता व मायलेजबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मनसुब्यासह खासरित्या तयार करण्यात आलेला इव्हेण्ट ‘मायलेज का हिरो’ आयोजित करण्यात आला.
ही स्पर्धा एचएफ डिलक्सच्या मालकांना मोटरसायकलशी अधिक परिचित होण्याची, प्रतिकिलोमीटर मायलेजचे गणन करण्याची आणि प्रक्रियेमध्ये ओळखले जाण्याची संधी होती. अधिकतम मायलेज संपादित करण्यासाठी एचएफ ग्राहकांना शर्यतीपूर्वी रायडिंगसंदर्भात सूचना देण्यात आल्या. ग्राहकांसमोर इलेक्ट्रॉनिकली मायलेज गणन करण्यात आले आणि प्रत्येक ग्राहकाने प्रतिलिटर १०० किमीपेक्षा अधिक अंतराच्या मायलेजची नोंद केली.
बीएस-६ प्रमाणित इंजिन असलेल्या एचएफ डिलक्समध्ये प्रगत प्रोग्रामेबल-फ्यूएल-इंजेक्शन आणि एक्ससेन्स तंत्रज्ञान आहे. एचएफ डिलक्समध्ये १०० सीसी इंजिन आहे. हे इंजिन ८००० आरपीएममध्ये ७.९४ बीएचपी पॉवर आऊटपुट आणि ६००० आरपीएममध्ये ८०५ एनएमचे ऑन डिमांड सर्वोच्च टॉर्क देते.
शक्तीसंदर्भात उच्च असलेली ही मोटरसायकल प्रोग्राम एफआय सिस्टिम आणि हिरोच्या क्रांतिकारी आय३एस (इडल स्टार्ट-स्टॉप सिस्टिम) तंत्रज्ञानामुळे इंधन-कार्यक्षम देखील आहे. हे तंत्रज्ञान ९ टक्के अतिरिक्त इंधन बचत देते.
उच्च टेन्साइल स्टीलसह निर्मिती आणि १६५ मिमीचे व्यापक ग्राऊण्ड क्लीअरन्स व १२३५ मिमी व्हीलबेससह मोटरसायकल भारतीय रस्त्यांवर राइडरला अधिक सुलभ व आरामदायी प्रवासाची खात्री देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
मोटरसायकलच्या डिझाइनमध्ये आकर्षक फ्रेमच्या फ्यूजनसह आकर्षक रंगसंगींचे संपन्न व क्लासिक संयोजन आहे. ही मोटरसायकल ७ अद्वितीय रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहे – टेक्नो ब्ल्यू, ब्लेझिंग रेड, नेक्सस ब्ल्यू, हेवी ग्रीनसह ग्रे, हेवी ग्रेसह ब्लॅक, ब्लॅकसह पर्पल आणि ब्लॅकसह रेड.
३० वर्षीय विद्यार्थी संग्राम हिरवे म्हणाला, ”हिरो कंपनीवरील माझा विश्वास आता अधिक दृढ झाला आहे आणि मी माझे नातेवाईक व मित्रांना उत्तम मायलेजसाठी फक्त हिरो वेईकल खरेदी करण्याचा सल्ला देईन.”
५६ वर्षीय शेतकरी शिवाजी आंबेकर म्हणाले, ”मी शेतकरी आहे आणि ऑफ-रोड माझ्या एचएफ डिलक्सवरून प्रवास करतो. हिरो एचएफ डिलक्स कार्यक्षमता व मायलेजसंदर्भात सर्वोत्तम आहे.”
२८ वर्षीय खाजगी क्षेत्रात नोकरी करणारा राकेश पाटील म्हणाला, ”मी अधिककरून शहरामध्ये माझी बाइक चालवतो, एचएफ डिलक्स शहरामध्ये देखील उत्तम मायलेज देते. मी माझ्या एचएफ डिलक्सच्या कामगिरीबाबत खूपच समाधानी आहे.”