कोल्हापूर ता.08 : फुटबॉल खेळाला तसेच खेळाडूंना चालना देण्याकरिता महानगरपालिकेच्यावतीने दि. ४ ते १५ मार्च २०२० या कालावधीत भव्य प्रमाणात महापौर चषक फुटबॉल स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धतील उपात्य पुर्व सर्व सामने खेळविण्यात आले होते. परंतु देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या बंदी आदेशामुळे महापौर चषक फुटबॉल स्पर्धामधील १ उपात्य सामना, तृतीय क्रमांक सामना व अंतिम सामना दि. १३ मार्च २०२० रोजी पासून स्थगित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी स्पर्धात्मक खेळासाठी बंदिस्त किंवा खुल्या ठिकाणी होणाऱ्या व बैठक व्यवस्था असणाऱ्या किंवा नसणाऱ्या ठिकाणी आसन क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल त्यास परवानगी असेलेचे सुधारित आदेश पारित केले आहेत.
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून कोविड-१९ व ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संदर्भात जाहिर केलेल्या निबंधाचे पालन करण्याचे अटीवरच सदर स्पर्धा घेणेबाबत परवानगी देण्यात आली आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धातील स्थगित करणेत आलेले. सामने विना प्रेक्षक व कोविड-१९ बाबतचे सर्व नियम व अटी यांची पुर्तता करुन दि. ११ ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करुन स्थगित करण्यात आलेले सामने खेळविण्यात येणार आहेत. यामध्ये शुक्रवार, दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुध्द फुटबॉल क्रिडा मंडळ यांच्यामधील उपांत्य सामना होणार आहे. रविवार, दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी प्रॅक्टीस फुटबॉल क्लब विरुध्द दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुध्द फुटबॉल क्रिडा मंडळ यांच्यातील विजयी संघासोबत होणार आहे. सर्व सामने कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशन यांच्या नियमानुसार काऊंट डाऊन प्रमाणे सुरवात होतील. शनिवार, दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी जनप्रतिनिधी विरुध्द प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण सामना खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामना झालेनंतर तात्काळ बक्षिस वितरणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
या स्पर्धेस खेळाडू संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, फिजिओथेरफिस्ट, पंच, मॅच कनिशनर, रेफ्रि असेसर व कर्मचारी यांचे कोवीड-19 चे दोन लसीकरणाचे डोस असणे बंधनकारक आहे. जर नसलेस 48 तासाचा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. त्याशिवाय क्रिडांगणावर प्रवेश दिला जाणार नाही. सदरची स्पर्धा हि विनाप्रेक्षक असल्यामुळे फुटबॉल प्रेक्षकांसाठी युटयुब चॅनेलच्या VIEWFINDER MEDIA या लिंकवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.