कार्यकर्त्यांना दिले प्रोत्साहन……
सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रस्त्यातच केले अभिष्टचिंतन…..
कोल्हापूर, दि. १२:कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरातील मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. दौ-याच्या सुरुवातीला सकाळी आठ वाजता विचारेमाळ येथील मतदान केंद्राबाहेरच कार्यकर्त्यानी लावलेल्या बूथजवळ रस्त्यातच मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे ५० व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. पुष्पगुच्छ देऊन व शाल अर्पण करून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना मिठीत घेत “ही दोस्ती तुटायची नाय” हेच संकेत दिले. त्यानंतर सदर बाजार, लाईन बाजार, कसबा बावडा, राजाराम साखर कारखाना केंद्र, कनाननगर, सिद्धार्थनगर, मंगळवार पेठ, पद्माराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल येथील मतदान केंद्रांना व बूथ कार्यकर्त्याना भेटी दिल्या.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या या मतदान केंद्राच्या भेटीच्या दौऱ्यात आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर आर. के पवार, माजी महापौर सौ. वंदना बुचडे, माजी महापौर सागर चव्हाण, माजी नगरसेवक बाबा पार्टे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, माजी स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उत्तम कोराने, पिंटू राऊत, बाळ मेढेकर, दिलीप पोवार, रमेश पोवार,
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सौ. जहिदा मुजावर, शेखर मंडलिक आदी प्रमुख सहभागी झाले.
आईस्क्रीमचा गारवा……….
ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ यानी शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूल मतदान केंद्राला भेट दिली. उन्हाचा तडका एवढा प्रचंड होता की मतदान केंद्राबाहेर बूथवर बसलेल्या कार्यकर्त्यांसमवेत मंत्री मुश्रीफ यांनीही आईस्क्रीमचा गारवा चाखला.