कोल्हापूर, दि.12 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती गुरुवार दि. १४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनातील मुख्य सभागृहात साजरी करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व पत्रकार अरुण खोरे यांचे ‘डॉ. आंबेडकर व गांधीजी, संवाद समन्वयाचे नवे पैलू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.ज्येष्ठ राजकीय विचारवंत अशोक चौसाळकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषविणार आहेत. सर्व करवीरवासियांनी व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.