कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यासही मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, वसंत मुळीक, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, अशोक भंडारे, बबन रानगे आदी मान्यवर उपस्थित होते.