: 7th World Conference on ‘Public Health and Nutrition’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिणार UK: Conference Series LLC Ltd (यु. के. कॉन्फरन्स सिरीज एल. एल. सी. लिमिटेड) यांचेकडून आयोजित करण्यात आला होता. या वेबिणारमध्ये जगभरातील भारत, इजिप्त, हंगेरी, इथोपिया, नायजेरिया, इटली, चीन, पाकिस्तान, कोलंबिया, रोमानिया आणि अमेरिका या राष्ट्रांमधील १३ Speakers यांनी आपल्या विषयाचे सादरीकरण केले. या आंतरराष्ट्रीय वेबिणारमध्ये डॉ. प्रतिभा देसाई, सहाय्यक प्राध्यापिका, समाजशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांना वक्त्या (Speaker) म्हणून आमंत्रित करणयात आले होते. तसेच डॉ. प्रतिभा देसाई यांनी “The Role of Accredited Social Health Activists (ASHAs) in Preventing and Managing COVID-19 Pandemic in Rural Western Maharashtra, India” या विषयावर शोध निबंध सदर केला. या शोध निबंधाच्या माध्यमातून डॉ. प्रतिभा देसाई यांनी कोविड महामारीच्या काळातील कोल्हापूरातील आशा स्वयंसेविका योगदान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. कोवीड महामारी नियंत्रणामध्ये आशा या स्वयंसेविकांची मोलाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूरातील आशांनी आपला जीव धोक्यात घालून कोवीड नियंत्रण करण्यामध्ये अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये आशा स्वयंसेविकांची महामारीच्या काळातील परिस्थिती, कामाचे स्वरूप, आशा स्वयंसेविकांना कामादरम्यान उद्भवणाऱ्या विविध अडचणी इ. घटकांचा प्रमुख उल्लेख होता. ग्रमीण आरोग्य संरक्षणामये स्वयंसेविकेची भूमिका मोलाची असल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यांच्या समस्या सोडवून त्यांना नियमित मानधन देणे हे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ तुटवडा असल्यामुळे कोवीड महामारी काळामध्ये हा तुटवडा भरून काढण्याचे काम आशा स्वयंसेविकांनी केले आहे. डॉ. प्रतिभा देसाई यांनी या प्रयत्नाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविकांच्या महामारीच्या काळातील योगदानाचे महत्व व जाणीव जागतिक स्तरावर करून दिली.