राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पियूष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला.
तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा, आज दिल्लीत शपथविधी झाला. भाजपचे खासदार पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक उपस्थित होते. शपथविधीनंतर महाडिक कुटुंबीयांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी बी न्यूज कॉर्नर फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच वेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता. आता राज्यसभेत नेतृत्व करतानाही धनंजय महाडिक यांच्याकडून तशीच भक्कम कामगिरी होईल,