कोल्हापूर ता.08 : महापालिकेच्यावतीने शहरात आपत्ती व्यवस्थापनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या वॉर रुमद्वारे 17 दिवसात 48 तासाच्या आत 207 तक्रारी निर्गत करण्यात आल्या आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नागरीकांच्या तक्रारी तातडीने निर्गत करण्यासाठी वॉर रुम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा संकलन, कचरा उठाव, गटर्स व नाले स्वच्छता, वादळ/पावसामुळे पडलेल्या झाडांचे कटींग करणे, औषध व धूर फवारणी, पालापाचोळा तातडीने उठाव करणेबाबत तक्रारी दाखल करुन घेण्यात येतात. हा वॉर रुम सोमवार, दिनांक 20 जून 2022 पासून सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये सतरा दिवसात 214 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी 207 तक्रारी महापालिकेने 48 तासाच्या आत निर्गत केल्या आहेत. यामध्ये आरोग्य विभागाबाबत कचरा उठाव करणे, गटर साफ करणे, झाडांच्या फांद्या उठाव करणेबाबत 163 तक्रारी, ड्रेनेज चोकअप काढणे व चेंबरमधील गाळ काढणेबाबतच्या 16 तक्रारी, नाला साफ करणे, चेंबर साफ करणे, धूर व औषध फवारणी करणेबाबत 11 तक्रारी व रोडवर पडलेल्या झाडांच्या फांद्या कटिंग करणे, धोकादायक झाड काढूण घेणेबाबतच्या 24 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
तरी पावसाळयामध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी वॉर रूममधील 0231-2542601, 2545473 या दोन फोन नंबर्सवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. या वॉर रुममध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कार्यालयीन वेळेत तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. शासकीय सुट्टीदिवशी नागरीकांनी 9766532037 या नंबरवर व्हॉटस्पद्वारे आपल्या तक्रारी नोंद करणेच्या आहेत.