कोल्हापूर/प्रतिनिधी : स्वयंम ही दिव्यांग मुलांची शाळा आहे.या शाळेत अनेक दिव्यांग मुलांना शिक्षण दिले जाते.समाजात या शाळेची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू असून शाळेचे कामकाज व कार्य उत्तम सुरू आहे.मात्र शाळा अधिक भक्कमपणे उभी राहण्यासाठी समाजातील दातृत्वानी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या वतीने कसबा बावडा येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा संचलित स्वयंमशाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाख रुपये खर्च करून ई लर्निंगची सुविधा शाळेतील आठ वर्गांकरिता उपलब्ध करून दिली गेली आहे.ज्यात लॅपटॉप, टीव्ही, सॉफ्टवेअर अशा साहित्याचा समावेश आहे. शिवाय याच शाळेतील दिव्याग विद्यार्थ्यांचा
शारीरिक व बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने शाळेच्या आवारात
सुसज्ज असे विविध उपकरणांचा समावेश असलेले भव्य असे सेन्सरी उद्यान उभे केले गेले आहे. या ई लर्निंग व सेन्सरी (स्पर्श)उद्यान उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी स्वयंम शाळेस पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन रोटरी सनराईज या सामाजिक संस्थेतील सर्व पदाधिकारी यांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना रोटरी सनराईजचे माजी अध्यक्ष यांनी शाळेने आमच्याकडे प्रस्ताव पाठविला होता याचा अभ्यास करून आम्ही या शाळेस ई. लर्निंग व सेन्सरी गार्डन उभे करून दिले आहे.हे काम करत असताना ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांमुळे हे पूर्णत्वास आले असल्याचे सांगितले.यावेळी स्वयंम स्कुल चेअरमन शोभा तावडे यांनी रोटरी सनराईजने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा आणि इतर क्लबचे पदाधिकारी व सदस्य यामध्ये विक्रांत सिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे याला मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले होते.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सध्याचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, व सचिव राहुल.एस. कुलकर्णी होते. या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल व रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व भावी होणारे प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे व माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक व विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते,अजय मेनन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक स्वयंम शाळा उपाध्यक्ष अमर पाटील यांनी केले.आभार सेक्रेटरी सतीशराज जगदाळे यांनी मानले.