भाजीपाला विक्रेत्यांच्या पहिल्याच भेटीत दिले अर्थसहाय……..
कागल, दि. २१:आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागल शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसायासाठी अर्थपुरवठा केला. भाजीपाला विक्रेत्यांनी आमदार श्री. मुश्रीफ यांची भेट घेऊन ही मागणी केल्यानंतर पहिल्याच भेटीत १६ भाजीपाला विक्रेत्यांना वित्त संस्थांच्यामार्फत प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे हा अर्थपुरवठा केला.
याबाबत अधिक माहिती अशी, कागल शहरातील बॅरिस्टर खर्डेकर चौक व श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संघटना आहे. दैनंदिन व्यवहारासाठी अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी त्यांनी आमदार श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली.
“विक्रेत्यांच्या पाठीशी…..” “श्री. मुश्रीफ म्हणाले, या भाजीविक्रेत्यांसह शहरातील सर्वच छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. कोणत्याही अडचणीसंदर्भात त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.”
यावेळी सागर माळी, धनाजी माळी, उत्तम शिंदे यांच्यासह राजश्री शिवाजी माळी, नजमा पटेल, अरुणा वायदंडे, लक्ष्मीबाई सोनुले, सुशीला जाधव, सलीम उबळे, विद्या यादव, अरुणा कांबळे, मिनाक्षी वड्ड, पंडित वड्ड, संगीता टोणपे, इंदूबाई कदम, इसाक हुबळे, उज्वला सणगर, सदाशिव कांबळे, पाकेजा मुल्ला आदी भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.