व्हन्नूरमध्ये ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सांगता…….
व्हन्नूर, दि. २1:विज्ञान ही जीवनातील अत्यावश्यक बाब आहे, विज्ञानामुळेच आजचे जग जवळ आले आहे. जीवन सुसह्य होण्यासाठीच वैज्ञानिकांची गरज असून असे वैज्ञानिक घडवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ यानुसार विज्ञानाची आवड असणाऱ्या मुलांना शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्यास भावी शास्त्रज्ञ तयार होण्यास मदत होईल असे प्रतिपादन कागलचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात आयोजित पन्नासाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते .अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, विज्ञानाच्या मदतीने प्रगतीकडे वाटचाल करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये , निसर्ग उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे विज्ञान प्रदर्शनामध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी व्यासपीठावर पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम ,गटशिक्षणाधिकारी डॉ जी.बी.कमळकर , विस्तार अधिकारी आर. एस. गावडे व सारिका कासोटे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड ,शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाळ डेळेकर, सरपंच सौ . मोरे, शाळेच्या अध्यक्षा श्रीमती निकम, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. जी. पाेवार आदी उपस्थित होते.