कोल्हापूरातील आई अंबाबाई मंदिर येथे महिलांसाठी अनेक वर्षांपासून स्वच्छतागृह नसल्यांने दर्शनाला येणाऱ्या माता-भगिनींचे प्रचंड हाल होत आहेत, या गंभीर विषयावर अनेक वर्ष नुसते चर्चेचे गुऱ्हाळ सूरू आहे, याला सर्वस्वी जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासन व देवस्थान समिती जबाबदार असल्याने प्रथमतः आम्ही आपला जाहीर निषेध करीत आहोत, आपल्या सर्वांची निश्क्रियता व इच्छाशक्ती नसल्याने हा गंभीर प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत राहिला आहे, गर्दीच्या वेळी किंवा नवरात्रोत्सवात लाखो भाविक कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये मोठयाप्रमाणात महिला भाविकांचा सहभाग असतो, याचे भान जिल्हाप्रशासनाला नसावे हे दुर्दैव म्हणावे लागेल.
पालकमंत्री केसरकर साहेब आपणाला विनंती आहे की आपण ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी उपस्थित राहणार आहात पण त्याआधी आई अंबाबाई मंदिर येथे महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत याचे आपण आत्मचिंतन करावे व त्यासाठी ठोस पावले उचलावीत ही विनंती शिवसेनेच्या वतीने आपणांस विनंती करीत आहोत, यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हांला भविष्यात मोठे जनआंदोलन उभा करावे लागेल.अंबाबाई मंदिर येथे महिलांसाठी तात्काळ स्वच्छतागृह उभारावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी’ मंजित माने’ शुभांगी पोवार कोथळी, सुरेश पोवार, सुप्रिया पाटील, स्मिता सावंत, पूनम फडतरे, सुशील भांदिगिरे,संतोष रेडेकर, राहुल माळी, विशाल देवकुळे, विवेक काटकर, विराज पाटील,प्रतिगण्या उतुरे, सविता कानूरकर, राजेंद्र पाटील, वैष्णवी पाटील, लता पाटील, संगीता गौपले, सुनीता नरके, दीपाली शिंदे, शुभांगी पोवार, पोपट दांगट, सोनिया चव्हाण,काजल दुकांडे, सानिका दामुगडे, सिद्धी दामुगडे,मनाली जाधव, , गीता हसुरकर, प्रीती क्षीरसागर, कमल पाटील,मंगल पवार, अश्विनी देसाई, आशाताई कदम, माधुरी जाधव, सुरेखा गाडीवडर,संध्या टिपूगडे