कोल्हापूर, : सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन सेवा प्रदाता असलेल्या रियलमीने आज त्याच्या हीरो नंबर सिरीज आणि एआयओटी सेग्मेंटमध्ये नवीनतम प्रॉडक्ट्सची भर घालत चार रिव्होल्युशनरी प्रॉडक्ट्स लाँच करण्याची घोषणा केली. रियलमी ११ ५जी, रियलमी ११एक्स ५जी, रियलमी बड्स एअर ५ आणि रियलमी बड्स एअर ५ प्रो ही अभूतपूर्व बदल घडवून आणणारी उपकरणे अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि कल्पक डिझाईनचे निर्दोष संयोग दर्शवतात आणि ती तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवले नसेल, असा अनुभव प्रदान करण्यासाठी तयार केली आहेत.
रियलमी ११ ५जी मध्यम-रेंजच्या रिव्होल्युशनरी स्मार्टफोन सेग्मेंटमधील सर्वोत्तम अशा १०८ एमपी प्रमुख कॅमेऱ्यासह येतो, जो सेग्मेंटमधील सर्वात मोठा सेन्सर असलेल्या ३एक्स इन-सेन्सर झूमला सपोर्ट करतो. यामध्ये सेग्मेंमधील सर्वात वेगवान ६७ डब्ल्यू सुपरवूक चार्जिंग सोल्यूशन आणि ५००० एमएएच ची एक भक्कम बॅटरी उपलब्ध आहे, जी वापरकर्त्यांना सर्वोत्तम चार्जिंगचा अनुभव प्रदान करते. या स्मार्टफोनचा १२० एचझेड डायनॅमिक अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले वापरकर्त्यांना आश्चर्यकारक अशा स्मूथ व्हिज्युअल अनुभवाचा आनंद घेण्यास सक्षम करतो आणि डीटेल्सकडे विशेष लक्ष देऊन तयार केलेल्या उत्कृष्ट ग्लोरी हॅलो डिझाइनला अभिमानाने प्रदर्शित करतो.यामध्ये १६जीबी पर्यत डायनॅमिक रॅमचा पर्याय आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे, ज्यामुळे दैनंदिन कामे आणि मल्टीटास्किंग अखंडपणे चालू राहतील याची खात्री मिळते. रियलमी ११ ५जी हा ग्लोरी गोल्ड व ग्लोरी ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये आणि रुपये १८,९९९ (८ जीबी+ १२८ जीबी) व रुपये १९,९९९ (८ जीबी+ २५६ जीबी) या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी ११एक्स ५जी हा पर्पल डॉन आणि मिडनाईट ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये आणि अनुक्रमे रु. १४,९९९ (६जीबी +१२८जीबी) व रु. १५,९९९ (८ जीबी +१२८जीबी) किमतीच्या दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
ह्या मॉडेलमध्ये हाय-रिझोल्यूशन (हाय-रेझ) ऑडिओ सर्टिफिकेशन, एलडीएसीएचडी ऑडिओ कोडेक, पर्सनलाईज्ड ऑडिओ अल्गोरिदम आणि इमर्सिव्ह ३६०° स्पॅसिअल ऑडिओ अनुभव देखील समाविष्ट-आहे. ४० तास चालणारे प्रभावी बॅटरी आयुष्य,अल्ट्रा-रिस्पॉन्सिव्ह ४० एमएस लेटन्सी आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्शन २.० युक्त सुधारित कनेक्टिव्हिटी आदींचा समावेश असलेल्या प्रगत फंक्शनॅलिटीजच्या माध्यमातून रियलमी बड्स एअर ५ प्रो कल्पनेच्याही पलीकडील अनुभव प्रदान करतो.एस्ट्रल ब्लॅक आणि सनराईज बेज अशा दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या ची किंमत रु. ४९९९ इतकी आहे.
रियलमी बड्स एअर ५, ३८ तासांची प्रभावी बॅटरी लाइफ, अल्ट्रा-रिस्पॉन्सिव्ह ४५ एमएस सुपर लो लेटन्सी आणि इंट्युसिव्ह कंट्रोल्स यांचा समवेश आहे. डीप सीब्लू आणि आर्क्टिक व्हाइट या दोन मोहक रंगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या इयरबड्सची स्पर्धात्मक किंमत रु. ३६९९ इतकी आहे.