*वर्ष २०२४ अखेरपर्यंत ३५० ग्राहक टचपॉइण्ट्सचे लक्ष्य*
कोल्हापूर, १८ ऑक्टोबर २०२३ : उत्पादन ऑफेन्सिव्ह धोरण लाँच करण्यासह स्पेशल फेस्टिव्ह ऑफरिंग्जची घोषणा करून स्कोडा ऑटो इंडियाने भारतभरातील आपले नेटवर्क २५० ग्राहक टचपॉइण्ट्सपर्यंत विस्तारित करण्याचा टप्पा गाठला. कंपनीच्या व्हॉल्यूम ड्रायव्हिंग कार्स – कुशक एसयूव्ही व स्लाव्हिया सेदान भारतात स्कोडा ब्रॅण्डच्या विकासामध्ये साह्यभूत ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त ग्राहक-केंद्रित्वावर प्रबळ फोकस राहिला आहे, जेथे नेटवर्क विस्तारीकरण महत्त्वाची भूमिका बजावते.
या उल्लेखनीय टप्प्याबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, भारतातील स्कोडा विकास धोरण आमची उत्पादन श्रेणी वाढवण्याबाबत असण्यासोबत आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री देखील घेतो. आमचा २५०वा ग्राहक टचपॉइण्ट देशातील आकडेवारी व पोहोचच्या संदर्भात मोठा टप्पा आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत राहू आणि ग्राहकांसाठी मालकीहक्क अनुभव वाढवू. याद्वारे स्कोडा कुटुंबामध्ये अधिकाधिक ग्राहकांचे स्वागत केले जाईल, ज्यांना बाजारपेठेतील सर्वात सुरक्षित कार्स प्रदान केल्या जातील.
गुलबर्ग, कर्नाटक येथे सेल्स आऊटलेटच्या उद्घाटनासह २५०वा ग्राहक टचपॉइण्ट टप्पा गाठण्यात आला. स्कोडा ऑटो इंडिया अधिक विस्तार करेल आणि वर्ष २०२४ अखेरपर्यंत त्यांचे ३५० ग्राहक टचपॉइण्ट्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचा इंडिया २.० प्रोजेक्ट २०१८ मध्ये सुरू झाला, जेथे मेड-फॉर-इंडिया, रेडी-फॉर-द-वर्ल्ड एमक्यूबी-एओ-एन व्यासपीठाने उत्पादन धोरणाचा मुख्य भाग तयार केला, तर अग्रणी वॉरंटीज, ०.४६ रूपये इतक्या कमी किंमतीपासून सुरू होणारा मालकीहक्काचा कमी खर्च आणि भारतभरातील नेटवर्क व सेवांमधील विस्ताराने ग्राहक-केंद्रित धोरणाला चालना दिली. कुशक राइट-हँड ड्राइव्ह केल्या जाणाऱ्या व जीसीसी देशांमध्ये देखील निर्यात करण्यात आली आहे.