स्पार्क्स या ख्यातनाम स्पोर्ट्स शूज ब्रँडने आपले खास ऑटम विंटर २३ कलेक्शन सादर केले आहे. फॅशनच्या बाबतीत काळाच्या पुढे असणाऱ्या नव्या पिढीला रिलॅक्सो कंपनीच्या या ब्रँडच्या कलेक्शनची स्टाईल आणि त्यातील आरामदायीपणा नक्कीच भावेल. आपल्यातील ‘स्व’चा सोहळा साजरा करण्याचा दृष्टिकोन कायम राखत स्पार्क्सने ‘स्पार्क्स-इट्स इन मी’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या अॅथलीझर आणि लाइफस्टाईल कलेक्शनमधील अत्यंत विचारपूर्वक आणि निवडक पद्धतीने बनवण्यात आलेल्या १०० हून अधिक बुटांच्या डिझाइन्स पाहता येतील.
हे नवे ऑटम विंटर कलेक्शन म्हणजे आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रतिक आहे. स्पार्क्स पादत्राणांच्या प्रत्येक जोडीत तुम्हाला आराम, टिकाऊपणा आणि सुयोग्य फिट मिळतोच. शिवाय, ही पादत्राणे फक्त दणकट नाही तर उच्च दर्जाचीही आहेत. पादत्राणे निवडताना आरामदायीपणा, दर्जा आणि विविध पर्याय हवे असणारे तरुण आणि उत्साही ग्राहक या नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे खूश होतील. स्पार्क्स ऑटम विंटर कलेक्शनमध्ये अप्रतिम डिझाइन, वरच्या भागातील मऊशार आणि हवेशीर मटेरिअल आणि दमदार सोल आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या पृष्ठभागांवर अतुलनीय ग्रीप मिळते.
ग्राहकांच्या बहूविध आवडीनिवडींनुसार तयार करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठीची पादत्राणे उपलब्ध आहेत. ९९९ ते २४९९ रुपयांदरम्यान असलेल्या या पादत्राणांमधून सर्वच ग्राहकांना स्टाईल आणि उत्तम दर्जा मिळेल याची खातरजमा स्पार्क्सने केली आहे. ४०० हून अधिक रिलॅक्सो ब्रँड आऊटलेट, आघाडीची फुटवेअर स्टोअर्स आणि relaxofootwear.com या अधिकृत वेबसाइटवर स्पार्क्सचे नवे कलेक्शन उपलब्ध आहे.
रिलॅक्सो फुटवेअर्स लि.चे कार्यकारी संचालक श्री. गौरव दुवा यांनी या नव्या उत्पादनांबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, “स्पार्क्स ऑटम विंटर २३ कलेक्शनमध्ये स्टाईल, आरामदायीपणा आणि दर्जा यांचा अचूक मेळ साधला गेला आहे. दैनंदिन आयुष्यात प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकता येईल अशी पादत्राणे उपलब्ध करून देण्यावरच आम्ही अगदी सुरुवातीपासून भर दिला आहे. स्पार्क्स-इट्स इन मी हे तत्व आमच्या नव्या कलेक्शनमधून प्रतित होते.”
“स्पार्क्स ऑटम विंटर कलेक्शनमधून आम्ही सकारात्मकता आणि खिलाडू वृत्तीचा सोहळा करत आहोत आणि हीच आजच्या तरुणाईची खरी ओळख आहे. हा उत्साह, दर्जा आणि आधुनिक डिझाइनला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी यातून दिसून येते,” असे सांगत रिलॅक्सो फुटवेअर्सच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख आणि उपाध्यक्ष श्री. सचिन छाब्रा यांनी ब्रँडची तत्त्वे अधोरेखित केली.
या श्रेणीतील सर्व उत्पादने हवेशीर आहेतच. शिवाय ती वजनालाही हलकी आहेत. त्यामुळे, फॅशन आणि फिटनेस अशा दोन्ही बाबींना महत्त्व देणाऱ्यांसाठी ती सुयोग्य पर्याय ठरतात. स्पार्क्ससोबत तुमचं प्रत्येक पाऊल हे आरामदायीपणा आणि स्टाईलचं प्रतिक असेल. शिवाय, यावरील ठळक प्रिंटिंग आणि आऊटसोल्सची रेंज रस्त्यावर हे बुट वापरताना अतिरिक्त साह्य करते. स्पार्क्स ऑटम विंटर २३ कलेक्शनमुळे उत्साही ग्राहक मनाप्रमाणे विहरू शकतील.