मुंबई,: जर्मनीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात घेतली भेट घेतली.जर्मनी देशाला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह जर्मनीच्या शिष्टमंडळाचे अँड्रियास रीफस्टेक,प्रो.डॉ.रोलँड हासहे उपस्थिती होते.
युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाचे उपायोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी राज्यस्तरीय कृती गट स्थापन करण्यात आले आहे. या कृती गटाचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठविण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिष्टमंडळासह भेट घेतली.बैठकीत श्री मुश्रीफ यांनी राज्यात विविध कौशल्य प्राप्त वैद्यकीय कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांना प्रशिक्षण आणि जर्मन भाषा शिकून निवड पात्र मनुष्यबळ जर्मनीत पाठवण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.