कोल्हापूर : वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रातील नं. 1 असलेल्या विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट च्या वतीने दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्व परिवारातील सदस्यांच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा देखिल विश्वचे संचालक श्री. प्रमोद कमलाकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अर्थव चंद्रकांत मुठेकर, प्रणोती प्रकाश पाटील, फाल्गुनी धनंजय पाटील, तमीम मुन्शी या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विश्वचे संचालक प्रमोद कमलाकर यांनी स्पष्ट केले की, शिक्षण हे हुशार होण्याकरिता नसून शहाणे होण्याकरिता असावे, मुलांचा कल व आवड याचा विचार होणे आवश्यक आहे. तुमच्यात असलेली ध्येय इच्छाशक्ती व तुमचे विचार तुम्हाला उंच घेऊन जाते, कठोर परिश्रमला पर्याय नाही. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करियर करण्याची संधी द्यावी, असे मौलिक मार्गदर्शन विश्वचे संचालक प्रमोद कमलाकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शैलीतून मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांना विश्वचे असेच मार्गदर्शन मिळावे आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या प्रत्येक वाटेवर विश्वची मदत मिळावी अशी अपेक्षा पालक चंद्रकांत मुठेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी विश्वच्या संचालकांसह विश्वचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.