कोल्हापूर , : स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीची घोषणा केली आहे आणि उत्पादनांची श्रेणी प्रगतीपथावर आहे. कंपनीने भारतातील आपल्या न्यू एराचा भाग म्हणून आपले नेटवर्क व ग्राहकवर्ग प्रबळ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या डिजिटलायझेशन धोरणामध्ये वाढ केल्यानंतर ब्रँडने आता डीलरशिप्स, सर्विस सेंटर्स आणि इतर ग्राहक टचपॉइण्ट्स अशा आपल्या प्रत्यक्ष मालमत्तांमध्ये नवीन कॉर्पोरेट आयडेण्टिटीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”जागतिक दर्जाच्या कार्स उत्पादित करण्यासह आम्ही नेहमी आमच्या ग्राहकांना, कुटुंबांना व चाहत्यांना सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि संपन्न अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटायझेशन अर्थातच आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या अनेक पद्धतींपैकी एक आहे. आमच्या सातत्यतेसह आम्ही ग्राहकांना व सर्व भागधारकांना देणारे आमचे मेसेजिंग, डिझाइन शैली, ओळख आणि चेहरा महत्त्वाचे आहेत. आम्ही २०२३ पासून आमचे कम्युनिकेशन्स व मार्केटिंगमध्ये आमच्या ब्रँडच्या नवीन कॉर्पोरेट आयडेण्टिटीची स्थिरपणे आणि जागरूकपणे अंमलबजावणी करत आहोत. आता, आम्ही नवीन टप्प्याकडे वाटचाल करण्यास सज्ज आहोत, ज्यामध्ये आमचे डिलरशिप्स आणि विविध ग्राहक टचपॉइण्ट्सचा समावेश आहे.”
खऱ्या अर्थाने व डिजिटली सर्वोत्तम
हे बदल स्कोडा ऑटो इंडियाने आपली पोहोच वाढवण्यासह ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हाती घेतलेले नॉन प्रॉडक्ट उत्क्रांती व सहभागांच्या सिरीजशी संलग्न आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत भारतात ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या जागतिक पदार्पणाची घोषणा करण्यासह न्यू एरामध्ये ब्रँडच्या प्रवेशानंतर स्कोडा ऑटो इंडियाने डिजिटलाइज्ड धोरणांची अंमलबजावणी केली, ज्यामुळे ग्राहक सहभागासंदर्भात क्रांती घडून आली.
कंपनीच्या पूर्णत: डिजिटल नेम युअर स्कोडा मोहिमेअंतर्गत आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी २,००,००० हून नावे मिळाली, तसेच आतापर्यंत २४,००० हून अधिक अद्वितीय नावे मिळाली आहेत. कंपनीच्या स्कोडाव्हर्स इंडिया व्यासपीठाने लाँच केल्याच्या १२८ मिनिटांमध्ये १२८ नॉन फंगीबल टोकन्स (एनएफटी) मिळाल्यानंतर स्कोडा गिअरहेड्स सदस्यत्व उपक्रमाची अंमलबजावणी केली, ज्यामुळे ग्राहक व चाहते प्रीमियम मर्चंडाइज, व्हीआयपी ट्रीटमेंट आणि इतर विशेष लाभांचा आनंद घेऊ शकतात. स्कोडा ऑटो इंडियाने देशामध्ये आपल्या स्थापनेच्या २४ वर्षांना देखील साजरे केले, जेथे २४ मार्च २०२४ रोजी २४-अवर सेलदरम्यान त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ७०९ बुकिंग्ज झाल्या.
उत्पादनांपलीकडे स्थानिकीकरण
भारत नवीन कॉर्पोरेट आयडेण्टिटीसह सर्व सुविधांचे रिब्रँड करणारी सर्वात गतीशील बाजारपेठ बनेल. अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे आणि जागतिक दर्जाचे सिग्नेज घटक तयार करण्यामधील स्थानिक कौशल्याचा फायदा घेत सिग्नेजेस् स्कोडा ऑटोच्या जागतिक मानकांनुसार आहेत. सर्व ग्राहक टचपॉइण्ट्स २०२५ मध्ये नियोजित नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या लाँचच्या वेळी नवीन कॉर्पोरेट आयडेण्टिटीसह सुसज्ज असतील. यामधून ग्राहकांना सतत उत्तम प्रवासाची खात्री मिळेल. नवीन कॉर्पोरेट आयडेण्टिटीच्या जलद अंमलबजावणीच्या खात्रीसाठी सर्व डीलर सहयोगी रिब्रँडिंग प्रक्रियेमध्ये सक्रियपणे सहभाग घेत आहेत.