नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्‍चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्‍या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात प्रचार आणि प्रसार करून, नशा मुक्तीसाठी प्रयत्न केले जातील. त्यातून नशामुक्त महाराष्ट्र हे अभियान यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा सक्रीय राहील, अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली.
तरूणाईसाठी आदर्शवत काम करणार्‍या कृष्णराज महाडिक यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने विश्‍वास दाखवला. त्यामुळेच अत्यंत कमी वयात कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येवून पडली. हा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी, राज्यभरात दौरा करून, तरूणाईची मते जाणून घेतली. या दरम्यान त्यांना इतर प्रश्‍नांसोबतच अनेक तरूण-तरूणी नशेच्या आहारी गेल्याचे दिसून आले. त्यातूनच त्यांनी युवा मोर्चाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधून, नशामुक्त महाराष्ट्र या चळवळीला सुरवात करण्याचे सुतोवाच केले होते. त्याची प्रत्यक्ष सुरवात करवीर नगरीतून झाली. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शुक्रवारी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या दूध कट्टयावर दूध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला युवा वर्गातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यापुढे हा उपक्रम राज्यातील विविध गावे आणि शहरांमध्ये राबवला जाणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. मिरजकर तिकटी इथं भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसमवेत कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. भाजपकडून राबवला जाणारा नशामुक्त महाराष्ट्र उपक्रम कौतुकास्पद आणि दिशादर्शक असल्याचे महाडिक यांनी सांगितले. आपल्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर होईल, असा विश्‍वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर