दक्षिण महाराष्ट्रात ASUS ने व्यावसायिक पीसी व्यवसाय अधिक मजबूत केला

कोल्हापूर, : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसूस इंडियाने दक्षिण महाराष्ट्रातील आपला व्यावसायिक पीसी व्यवसाय अधिक मजबूत करण्याची घोषणा केली आहे. उद्योग, कॉर्पोरेट्स, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांच्या वाढत्या डिजिटल गरजा लक्षात घेऊन कंपनीने AI-सक्षम लॅपटॉप, डेस्कटॉप, ऑल-इन-वन पीसी, मॉनिटर्स आणि क्रोमबुक्सचा समावेश असलेला एक्सपर्ट सिरीज पोर्टफोलिओ सादर केला आहे.
कंपनीनुसार, एसूस हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा व्यावसायिक पीसी ब्रँड असून, वार्षिक १७० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील ९४.५ टक्के पिनकोडमध्ये प्रत्यक्ष सेवा सहाय्य उपलब्ध करून देत ‘वरी फ्री बिजनीस एक्सपेरियन्स ’ देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
एसूस एक्सपर्ट सिरीजमध्ये AI-सक्षम एक्स्पर्टबुक लॅपटॉप, एक्स्पर्टसेंटर डेस्कटॉप, ऑल-इन-वन संगणक आणि प्रगत मॉनिटर्सचा समावेश आहे. या उपकरणांमध्ये मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, एंटरप्राइझ-स्तरीय सुरक्षा, वाढवता येणारी मेमरी आणि आधुनिक आयटी व्यवस्थापन सुविधा देण्यात आल्या आहेत.
कंपनीने स्थानिक चॅनल भागीदारांसाठी प्रशिक्षण, उत्पादन सादरीकरणे आणि कस्टमायझेशन सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला आहे. वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल घटक उत्पादन, कृषी-प्रक्रिया उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांना डिजिटल परिवर्तनासाठी सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ए सुस ने व्यक्त केले आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर