सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू यांचे निधन

मुंबई, महाराष्ट्र दि. १९ जून २०२६ : आयुर्वेद औषध निर्मिती क्षेत्रात गौरवशाली परंपरा लाभलेल्या सुप्रसिद्ध कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक, ५९ वर्षीय श्री. उमेश सांडू यांचे आज, शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता चेंबूर येथील त्यांच्या घरी आकस्मिक निधन झाले.
श्री. उमेश सांडू यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली. गोवा येथील कंपनीचा औषधनिर्माण कारखाना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. औषधनिर्माण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचे मोठे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे औषधनिर्माण क्षेत्रासह सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली शिवानी आणि कनिष्का, आई, दोन भाऊ, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार आहे.
श्री. उमेश सांडू यांची अंतिम यात्रा उद्या, शनिवार दि. २० जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता सांडू कंपाऊंड, सांडू वाडी, चेंबूर, मुंबई येथून निघणार आहे.

  • Related Posts

    एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफा

    कोल्हापूर : एंटाला इंडस्ट्रीज लिमिटेडचा ₹२३.३३ कोटींचा आयjपीओ २९ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार असून, २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. कंपनीने प्रति शेअर ₹६३ ते ₹६७ असा किंमत पट्टा निश्चित…

    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ

    कोल्हापूर : एआय प्लस स्मार्टफोनने आपल्या निवडक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबर २०२६ पासून ₹१,००० ते ₹३,००० पर्यंत वाढ जाहीर केली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफा

    एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफा

    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ

    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ
    इंडिया आयटीएमई 2026 सज्ज; अभ्यागतांसाठी विशेष सुविधा आणि व्यापक प्रचार मोहीम

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम