एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

कोल्हापूर, 19 जून, 2026: एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ मुंबईहून सुरू झाल्यानंतर कोल्हापुरात पोहोचली आहे. महिलांनी गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची नीट माहिती करून घेऊन स्वतःच्या आर्थिक भविष्याची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तयार केलेला, हा अशा प्रकारचा पहिलाच देशव्यापी गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता उपक्रम आहे.
घरातील आर्थिक निर्णय घेण्यामध्ये आणि कुटुंबासाठी संपत्ती निर्मितीमध्ये महिला बजावत असलेली वाढती महत्त्वाची भूमिका ओळखून, सहा महिन्यांच्या एका व्यापक संपर्क कार्यक्रमाद्वारे गुंतवणूकदार शिक्षण थेट देशभरातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, दोन प्रचार वाहने भारताच्या दोन वेगवेगळ्या दिशांना अनेक शहरे तसेच लहान गावांमधून प्रवास करतील. प्रत्येक ठिकाणी, एचडीएफसी म्युचुअल फंड अनेक वेगवेगळ्या परिसरांमध्ये जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधणारे उपक्रम आयोजित करेल. यामध्ये पथनाट्ये सादर केली जातील आणि गुंतवणूकदारांसाठी संवादात्मक जागरूकता सत्रे आयोजित केली जातील. पैशांशी संबंधित क्लिष्ट संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातील आणि गुंतवणुकीविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या ‘नारी निवेश यात्रे’च्या कोल्हापूर टप्प्यात शहरातील विविध प्रमुख ठिकाणी स्थानिक समुदायांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये महाद्वार रोड मार्केट, शाहू मार्केट, लक्ष्मीपुरी मार्केट, भाऊसिंगजी रोड मार्केट, गंगावेश मार्केट आणि शिवाजी मार्केट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. पथनाट्ये, गुंतवणूकदार जागरूकता सत्रे आणि थेट संवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती या विषयांवरील माहिती व चर्चा थेट शहरातील महिलांपर्यंत पोहोचवले.
या यात्रेचा मुख्य उद्देश अगदी सामान्य आणि तळागाळातील महिलांशी थेट संवाद साधणे हा आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान, एचडीएफसी म्युचुअल फंड देशभरातील महिला बचत गटांसाठी ६० खास कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना पैशांचे नियोजन कसे करावे, स्वतःचे ध्येय ठरवून योग्य गुंतवणूक कशी करावी आणि भविष्यासाठी मोठी पुंजी कशी उभी करावी, याचे सोपे मार्गदर्शन केले जाईल. तसेच, महिलांना गुंतवणुकीची चांगली आणि शिस्तबद्ध सवय लागावी यासाठी एक उत्तम संधी या निमित्ताने उपलब्ध करवून दिली जाईल.
या उपक्रमाबद्दल बोलताना एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “संपूर्ण भारतात, महिला अनेकदा घरातील सर्वात शिस्तबद्ध बचत करणाऱ्या सदस्य असतात. तरीही, वैयक्तिक आर्थिक बचतीविषयी योग्य चर्चा कधी झालीच नसल्यामुळे, अनेकींना पद्धतशीर गुंतवणूक करणे शक्य झाले नाही. ‘नारी निवेश यात्रा’ ही याच चर्चेवर आधारित आहे. पथनाट्ये, सामुदायिक सत्रे आणि बचत गटांशी थेट संवादाच्या माध्यमातून, आम्हाला ही चर्चा थेट महिलांपर्यंत पोहोचवायची आहे. यामुळे त्यांना गुंतवणूक ही कोणतीतरी अवघड किंवा लांबची गोष्ट न वाटता, त्यांच्या मनात आधीपासूनच असलेल्या आर्थिक ध्येयांना पूर्ण करणारे एक व्यावहारिक साधन वाटू लागेल.”
‘नारी निवेश यात्रा’ हा उपक्रम एचडीएफसी म्युचुअल फंडच्या ‘बरनी से आझादी’ (बरणीपासून मुक्ती) या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता मोहिमेचाच एक भाग म्हणून राबवला जात आहे. ही मूळ मोहीम लोकांना पारंपरिक बचतीच्या पद्धतींच्या पलीकडे जाण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माहितीपूर्ण गुंतवणुकीचे फायदे समजून घेण्यास प्रोत्साहित करते.

या यात्रेच्या माध्यमातून, एचडीएफसी म्युचुअल फंड आर्थिक जागरूकता वाढवण्याप्रती आणि महिलांना त्यांच्या आर्थिक ध्येयांच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले टाकण्यास सक्षम करण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.

एसआयपीचे (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) फायदे:
• मार्केटच्या वेळेचा अंदाज घेण्यापासून मुक्ती: शेअर बाजारात कधी घसरण होईल किंवा कधी तेजी येईल, याचा अंदाज लावण्याची गरज पडत नाही.
• दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी अत्यंत योग्य: दीर्घकाळासाठी जास्त पैसे जमा करण्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे.
• शिस्तबद्ध संपत्ती निर्मिती: यामुळे दरमहा नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पैसे साठवण्याची व वाढवण्याची सवय लागते.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर