कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २जानेवारी रोजी होत आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे एकूण १०सदस्य असल्यानं यावेळी संत्तातर निश्चित असल्याचं शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना सांगितलयं.तर अडीच वर्षापूर्वी जि.प. अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी काही कारणास्तव स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आले. मात्र यावेळी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने यावेळी संत्तातर अटळ आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून याबद्दल चा अंतिम निर्णय निर्णय जाहीर करण्यात येणार असून माजी मंत्री पाटील आणि माजी आमदार महाडिक यांना शिवसेनेची ताकद दाखवून देणार असल्याचा इशारा ही शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी यावेळी सांगितलयं.दरम्यान अध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा असल्याच ही दुधवडकर यांनी यावेळी जाहीर केलयं.विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर भाजपमुक्त झालं.दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड २ जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दुधवडकर म्हणाले २जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होणार आहे. अडीच वर्षापूर्वी अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी काही कारणास्तव स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आले होते. मात्र यावेळी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतअसल्याने जो निर्णय घ्यायचा असेल तो एकसंघपणे घेवून सर्व सदस्यांना एकजुटीने राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे एकूण १० सदस्य आहेत. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेमध्ये संत्तातर निश्चित असून शिवसेनेची ताकद माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि माजी आमदार महाडिक यांना दाखवून देऊ. याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे ही दुधवडकर यांनी यावेळी सांगितलयं.बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके आदी उपस्थित होते.