कोल्हापूर :- दि महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च ऍ़न्ड डेव्हलमेंट संस्थेच्या वतीने आज छ. राजर्षी शाहू सभागृहात महानगरपालिकेच्या शाळांच्या सर्व मुख्याध्यापक यांची कार्यशाळा महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गिरीष सामंत यांचे सन्मान चिन्ह व बुकलेट देऊन स्वागत केले.
यावेळी दि महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च ऍ़न्ड डेव्हलमेंट चे अध्यक्ष गिरीष सामंत यांनी बोलतांना शहरातील सर्वशाळा या डिजीटल झाल्या पाहिजेत त्यांना भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत हे मान्य आहे तथापी यावर परिणाम करणारे चार घटक अत्यंत महत्वाचे आहेत. पालक, शिक्षक, प्रशासन व शाळा व्यावस्थापन समिती या चारही घटकात समन्वयाची गरज आहे. अमेरिकेत दोनच प्रमुख घटक आहेत ती म्हणजे पोलीस आणि प्राथमिक शिक्षक. शिक्षकांचा मोठा सन्मान यादेशात केला जातो. तशी स्थिती येथे नसली तरी शाळेच्या निमित्ताने निदान डोक्यावर छप्पर आहे. वेतन मिळण्याची खात्री आहे. त्यामुळे शिक्षकांना आज जास्त काम करण्याची गरज आहे. काही वर्षात शिक्षकांना व्हर्च्युअल क्लासरुम पध्दतीने काम करावे लागेल. तथापी प्राथमीक शाळाची आवशकता भासणारच आहे. आजचे विद्यार्थी भावी नागरीक आहेत. त्याच्यावर शिक्षक जे संस्कार करतील त्याप्रमाणे ते घडतील शैक्षनिक गुणवत्तेच्या बाबतीत आमेरिकेतील स्टॅनफोर्ड या विद्यापिठाचा उल्लेख केला. स्टॅनफोर्ड हे जगातिल दोन नंबरचे मोठे विद्यापिठ आहे. हे विद्यापिठ आठ हजार एकर जागेत असून सतरा हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. समाज सहभागाचा त्यामध्ये मोठा वाटा आहे. शिक्षकामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असावा असे सांगून ते म्हणाले मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान नको तर देशभक्ती, शिस्त, आदर या गुणांनीयुक्त असा चांगला माणूस बनवा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक समिती सदस्य विजयसिंह खाडे पाटील यांनी बोलतांना महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शिषवृत्ती राज्यात प्रथम येतात यावरून शाळाची गुणवत्ता चागली आहे. शाळांचा स्तर सुधारला तर आणखी शाळेत चांगले शिक्षण देता येईल. यापुर्वी राजे संभाजी विद्यालय 36 विद्यार्थी होते अता त्याची पटसंख्या 63 हून अधिक झाली आहे. एक विट शाळे साठी हा उपक्रम शाळे साठी राबविला त्यातुन 1.40 लक्ष इतकी मदत शाळेला जमा झाली आहे.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना प्रत्येक शाळेची गुणवत्ता वाढली पाहीजे काही शाळा प्रगत आहेत. तर काही शाळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळांना भौतिक सुविधा पुरवण्याची आवशकता आहे. तथापी शाळानी आगोदर उपलब्ध सुविधांचा वापर सक्षमतेने करण्याची गरज आहे. विद्यार्थ्याना हसत, खेळत शिक्षन मिळाले पाहिजे तसेच शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षणही मिळाले पाहिजे विद्यार्थ्यामध्ये, पालकामंध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होने आवश्यक आहे. शाळांना कोणत्या सुविधाची गरज आहे. त्याचा वस्तूस्थिती दर्शक आराखडा शाळेनी दयावा त्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर यांनी सर्वच पालक, शिक्षक, प्रशासन, लोकप्रतिनीधी यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शिक्षकांमध्ये गुणवत्ता व विद्यार्थ्यामध्ये बुधिमत्ता आहे. शाळांची गुणवत्ता वाढवणे विद्यार्थी विकास, प्रगती याबाबत शिक्षकानी आपसात उपक्रमांची देवान घेवान करावी प्रति महिना असे चर्चा सत्र व्हावे. शाळांना सहकार्य करणारच आहे. तथापी शिक्षकही पटसंख्या, गुणवत्ता वाढिसाठी उत्साहने काम करतील असी अपेक्षा व्याक्त करत असल्याचे सागितले.
आभार प्रदर्शन व्यक्त करतांना प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी महानगरपालिकेच्या सर्वच शाळेतील शिक्षक चागले काम करत आहेत. पदाधिका-यानी त्यांचे पाठिवर असाच हाथ ठेवल्यास शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. खाजगी शाळांच्या पुढेही आपण जाऊ अशी आशा व्याक्त करुन उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी उप महापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका अर्चना पागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, दि महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च ऍ़न्ड डेव्हलपेंट यासंस्थेचे शरद सामंत, क्रिकेटपट्टू अवधुत झारापकर, अनंत खासबारदार, लेखक शशिकांत सावंत, माजी नगरसेवक राजू लाटकर, कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, लेखापाल बाबा साळोखे, शैक्षिणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सौ.उषा सरदेसाई, नचिकेत सरनाईक, राजेंद्र आपुगडे, सचिन पांडव, शांताराम सुतार, महापालिका सर्वशाळेतील मुख्याध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.