कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर येथील जवाहर नगर मधील रहिवाशी तसेच पोटगी बंद आंदोलन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र रामचंद्र पोळ यांच्यावर कौटुंबिक न्यायालयाने चुकीच्या माहिती आधारे लादलेली पोटगी रद्द करावी यासाठी हायकोर्ट च्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुन्हा कोल्हापुरात सदर निकाल दिलेल्य न्यायालयात दाद मागत आहोतमात्र यास अत्यंत विलंब लागत तो निर्णय लवकर होऊन पोटगी रद्द व्हावी या मागणीसाठी येत्या ८ जानेवारी पासून कौटुंबिक न्यायालयासमोर आमरण उपोषण करणार असून आगामी काळात योग्य न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन करणार असल्याचा इशारा पोटगी बंद आंदोलनाचे संस्थापक समन्वयक अतुल छाजेड ( पुणे ) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिलायं. कोल्हापूरमधील जवाहर नगर येथे राहणाऱ्या रवींद्र पोळ यांचे पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दिं. ७मे २०१९ रोजी सातारा येथील एका महिलेशी लग्न झाले. मात्र लग्नानंतर सदर महिला ही चुकीच्या पद्धतीने वागत पहिल्या दोन मुलांची तसेच वयस्कर वृद्ध सासू-सासर्यांची कोणती जबाबदारी घेत नसून तिला संसारात कोणताही रस नसल्यास निदर्शनास आल्यानं पोळ यांनी घटस्फोट साठी कोर्टात अर्ज केला होता. दरम्यान दिनांक २२ मे २०१४ रोजी वस्तुस्थिती पाहून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने पहिल्या दिवसापासूनच पोळ यांचा झालेला हा विवाह रद्द झाल्याचा निकाल दिला .
त्यानंतर सदर महिला सातारा जिल्हा सहकारी बँकेत मोठ्या पगारावर काम करत असतानाही ही माहिती लपवून ठेवून चुकीची माहिती दिल्याने कौटुंबिक न्यायालयाने रवींद्र पोळ यांना दरमहा तिला तीन हजार रुपयाची पोटगी देण्याचे आदेश गेले आहेत.पोळ कर सल्लागार आहेत पण सध्या जीएसटी लागू झाल्याने त्याची मिळकत अगदीच नाममात्र होत आहे .ती पूर्वी इतकी राहीलेली नाही .तसेच सदर महिलाही जिल्हा सहकारी बँकेतील नोकरीसह पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यामुळेच सदर पोरगी रद्द व्हावी आणि रवींद्र पोळ यांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी दिं.८जानेवारीपासून कोल्हापूरात कौटुंबिक न्यायालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी पोटगी बंद आंदोलनाचे अतुल छाजेड आणि रवींद्र पोळ यांनी दिलायं. त्याची सुरुवात सीपीआर हाँस्पीटल समोर एक दिवशी लाक्षणिक उपोषणाने होणार आहे या आंदोलनाची पूर्वकल्पना कौटुंबिक न्यायालय तसेच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पोलीस स्थानकात देण्यात आली आहे आगामी काळात शांततेत आणि लोकशाही मार्गाने अश्या प्रकरणात नाहकपणे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावे लागलेल्या अनेकांना संघटित करत आंदोलन व्याप्ती वाढवली जाईल असा इशाराही यावेळी अतुल छाजेड यांनी दिलायं. दरम्यान रवींद्र पोळ घरी नसताना परस्पर त्यांच्या घरी जाऊन वयस्कर लोकांना दमदाटी केल्यानेच याचा धसका घेऊन आपले वडील वारले. या पुढे इतर कोणालाही त्रास देऊ नये व घरी जाऊ नयेच असे आदेश सदर महिलेस न्यायालय दिल्याचेही रविंद्र पोळ यांनी सांगितले.