कोल्हापूर :- शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने आज केशवराव भोसले नाटयगृह येथील शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, उद्योगपती व्ही.बी.पाटील, प्रतापराव सरनाईक, अमर सरनाईक, विजयराव सरनाईक, शाहिर आझाद नाईकवडे, दिलीप सावंत, रंगराव पाटील, डॉ.अरुण शिंदे, शंकर पाटोळे, युवराज सरनाईक, सुनिल मालगावे, विजय लाड, संग्राम सरनाईक, दिग्वीजय सरनाईक, विनोद सरनाईक,सुनिल आळवेकर, कारभारी ग्रुप, समिर म्हाब्री व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.