कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयाच्या दारातच उपचारासाठी आलेल्या जखमींच्या खिशातील एमआय कंपनीच्या मोबाईलचा स्फोट होवून त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झालीयं. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२) रा.आंबेडकर नगर कसबा बावडा असं जखमींच नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूरात आंबेडकर नगर कसबा बावडा इंथ प्रफुल्ल कांबळे याच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान आज सकाळी काही कारणाने शेजारच्या व्यक्तीबरोबर भांडण होवून झालेल्या मारामारीमध्ये त प्रल्हादच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जखमी झाला.तात्काळ तो आपल्या वैशाली नावाच्या बहिणी सोबत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आला असता गाडी लावत असताना अचानक त्याच्या प्यांटच्या खिशातील एमआय कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाला.त्यामध्ये प्रफुल्ल कांबळे याच्या डाव्या पायाच्या मांडीस मोठी दुखापत होवून तो गंभीर जखमी झाला.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दैव बल्वतर म्हणून मोठी दुर्घटना टळली