कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन आदेशानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचं सत्र सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळं विद्यार्थी वाहतूक रिक्षांवर होणारी कारवाई थांबवावी या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हा वाहनधारक संघाच्या वतीनं बिंदू चौक इथं डोळ्यावर काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूरात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिक्षांचा वापर केला जातोयं. मात्र गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन आदेशानुसार अशा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचं सत्र सुरू आहे.त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षांन सुरू असलेली विद्यार्थी वाहतूक कोलमडली असून पालकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तर त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणावर परिणाम होत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबद्दल महाराष्ट्र शासनाला योग्य तो अहवाल पाठवून कायदा व व्यवहार यांचा समन्वय साधून विद्यार्थी आणि पालकांची होणारी गैरसोय टाळावी या प्रमुख मागणीसाठी आज बिंदू चौकात जिल्हा वाहनधारक संचाच्या वतीनं काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं.दरम्यान ” आमच्या रिक्षा मामाला आडवू नका”असं विद्यार्थी साद घालत आहेत या आशयाचं फलक आंदोलनाचे आकर्षण ठरले.
आंदोलनात राजू जाधव,चंद्रकांत भोसले,अभिषेक देवणे,विजय गायकवाड,दिलीप सूर्यवंशी यांच्या सह जिल्हा वाहनधारक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.