कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात मराठा स्वराज्य भवन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शुक्रवार दिं.३ ते सोमवार दिं.६ जानेवारी दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलयं.या चार दिवसीय चालणाऱ्या राजर्षी शाहू महोत्सवाचं उद्घाटन महापौर सौ.सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते तर विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि शशिकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार रुजावेत आणि कोल्हापूर शाहूमय बनावं या हेतूने गेल्यावर्ष्यापासून राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव सुरू करण्यात आलायं. महोत्सवाचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून य महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवार दिं.३ जानेवारी रोजी सायंकाळी ४वा.ऐतिहासिक दसरा चौकात महापौर सौ.सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते तर आमदार ऋतुराज पाटील,आमदार चंद्रकांत जाधव,गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, सिनेकलावंत आनंद काळे,उद्योजक सतिश कडूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. चार दिवस चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असणार असून यामध्ये गृहउपयोगी,उद्योग व व्यवसाय, ग्रंथ प्रदर्शन, फुलझाडे, फर्निचर, गाड्या आदी व्यवसाय चालण्यासाठी ७५ स्टाॅल उभारण्यात येणार आहेत. तर बालगोपालासाठी विविध प्रकारची खेळणी आणि खवय्यांसाठी खास चटक पदार्थासह बिर्याणी खाद्यापदार्थांची रेलचेल असणार आहे. तसेच यंदा महिलांसाठी पारंपरिक सह विविध स्पर्धा, व्याख्यान, मर्दानी खेळ,शाहीरी गीतगायन,रेकॉर्ड डान्स आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या वर्षापासून समाजातील डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक, इतिहास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहेत.दरम्यान या महोत्सवास भेट देणाऱ्यांमधूनशेवटच्या दिवशी लकी ड्राॅ काढण्यात येणार आहे. तरी या महोत्सवाचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलयं.
पत्रकार परिषदेला उत्तम जाधव, बबनराव रानगे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अवधूत पाटील,शंकरराव शेळके,सी.एम.गायकवाड, नितीन हरगुडे (सी.ए)उपस्थित होते.
महोत्सव रूपरेखा
शुक्रवार दिं.३ जानेवारी – दु.१वा.महिला लोककला सादरीकरण(भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी,वासुदेव),दु.४वा.महोत्सव उद्घाटन,सायंकाळी ५वा.उखाणे स्पर्धा,७वा.शाहीरी कार्यक्रम.
शनिवार दिं.४जानेवारी – स.११वा.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज मार्गदर्शन शिबीर, दु.१२वा.फ्लॉवर डेकोरेशन ,सँलड डेकोरेशन, दु.१वा.महिलांसाठी विविध स्पर्धा(संगीत खुर्ची, सुप नाचवणे,घागर फुकणे).३वा.टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे,४वा.मर्दानी खेळ,सायंकाळी ६वा.मिमिर्क्री ,सोलो डान्स, अजय-अतुल गाण्यांचा कार्यक्रम, रात्री ७ वा मराठी- हिंदी गीत कार्यक्रम, दिव्यांग संभाजी यादव आवाजातून वाद्य.
रविवार दिं.५जानेवारी – सकाळी १०वा.फेटा बांधणे प्रशिक्षण,११वा.महिला स्पर्धा(फेस पेंटिंग, हेअर स्टाईल, नेल आर्ट मेहंदी,१२वा.बिर्याणी तांदळापासून बनवलेला गोड-तिखट पदार्थ,२वा.ऐतिहासिक वेशभूषा (लहान गट,मोठा गट,खुला),सायंकाळी ५वा.हास्यविनोद कलाकार आत्माराम पाटील अँड कंपनी,६वा.युवक कलागुण(कल्चर कट्टा, धूमधडाका कलामंच),७वा.रेकॉर्ड डान्स स्पर्धा(लहान मोठा गट).
सोमवार दिं.६जानेवारी रोजी सकाळी ११ वा.सर्व समाज विद्यार्थी विविध दाखला शिबीर(जात,उत्पन्न, रहिवासी दाखला),दु.२वा.कविसंमेलन,५वा.मराठी-हिंदी गीत कार्यक्रम(कराओके)व शाहीरी, त्यानंतर सायंकाळी ६वा.राजर्षी छत्रपती शाहू महाराज महोत्सवाचा सांगता आणि पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.