कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.राजमाता जिजाऊंची जयंती गावखेड्यात साजरी केल्याने जिजाऊंचे कार्य, राष्ट्रप्रेम, रयते बाबतचे धोरण आणि दोन छत्रपती घडवताना केलेली संस्काराची जाणीव आजच्या समाजाला झाल्यास प्रत्येक घराघरात शिवराय शंभूराजे यांच्या विचारांचे मावळे तयार होवून “तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय” ही घोषणा घरोघरी प्रेरणा देण्याचे काम करेल.यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात दिं.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन संभाजी ब्रिगेड च्या वतीने पोस्टाच्या माध्यमातून पत्राद्वारे गावोगावी ग्रामपंचायत, मुख्याध्यापक, पोलीस पाटील यांच्या सह नागरिकांना करण्यात आलयं.सदरची पत्रे पोस्टाचे एस.बी.मोमीन ,सब पोस्ट मास्टर
यांनी स्वीकारली.दिं. १२ जानेवारी रोजी आपापल्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवून जिजाऊंची जयंती साजरी करण्याचे आवाहन करणारे पत्र पोस्टाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड ने पाठवले आहेत. तसेच मातृतिर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा बुलढाणा लाखोंच्या उपस्थितीत जिजाऊ जयंती साजरी होते व यावेळी कोट्यवधी रुपयांची पुस्तके लोक खरेदी करतात. या सोहळ्यात दरवर्षी कोल्हापूरमधून हजारो लोक स्वखर्चाने जातात यंदाही जास्तीत जास्त समाजाने जिजाऊ जयंतीस सिंदखेडराजा येथे यावे असे आवाहन करण्यात आलायं. दरम्यान संभाजी ब्रिगेड कोल्हापूर च्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका सर्व शासकीय निमशासकीय आस्थापनांनी १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती विविविध उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन पोष्टातून पत्राद्वारे करण्यात आलयं.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, कोल्हापूर विकी जाधव ,भगवान कोइकडे, अभिजीत कांजर ,उमेश जाधव, रमेश यादव, अभिजीत भोसले यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.