कोल्हापूर :-महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रं.1 अंतर्गत अतिक्रमण व इस्टेट विभागाने आज केलेल्या संयुक्त कारवाईत हॉकी स्टेडीयम ते बालाजी पार्क, रामानंदनगर पूल ते निर्मिती चौक, निर्मिती कॉर्नर ते आय टी आय कळंबा रोड व परिसरातील 40 अतिक्रमीत केबीन्स व शेड, 25 बॅनर व झेंडे, 9 पार्किगमधील शेड इत्यांदी मिळून 74 अतिक्रमणे काढण्यात आली.
स्थायी समिती सभेमध्ये झाले आदेशानुसार सदरची कारवाई आज अतिक्रमण निर्मुलण मोहिम राबवण्यात आली. हि कारवाई 1 जेसीबी, 2 डंपरच्या सहाय्याने करण्यात आली. सदरची कारवाई शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनिल भाईक, अनिरुध्द कोरडे, जुना राजवाडा पोलिस स्टेशनकडील कॉन्स्टेबल, पवडी, इस्टेट, फायर स्टेशन, विद्युत व अतिक्रमण विभागाकडील 45 कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. सदरची अतिक्रमण कारवाई अशीच चालू राहणार असून संबधीतांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.