कोल्हापूर :- महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 1949 अंतर्गत सर्व नोंदणीकृत, अनोंदणीकृत वैद्यकिय व्यावसायिकांना कळविण्यात आले आहे की, ज्या वैद्यकिय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयाचे नोंदणी, नुतनीकरण प्रक्रिया अद्याप पुर्ण करण्यात आलेली नाही. अथवा नोंदणी, नुतनीकरण करण्यबाबत इकडील कार्यालयास अर्ज करण्यात आलेला नाही अशा सर्व वैद्यकिय व्यावसायिकांनी आपला नोंदणी, नुतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने आवश्यक सर्व कागदपत्रासहित विहित फी भरून कोल्हापूर महापालिकेच्या (kolhapurcorporation.gov.in ) या वेबसाईटद्वारे सादर करण्याचा आहे. या नुतनीकरणाचा अर्ज दि.31 जानेवारी 2020 पर्यंत या कार्यालयास प्राप्त होईल याची दक्षता संबंधीतानी घ्यावयाची आहे. जे रुग्णालय चालक दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणार नाहीत अशा रुग्णांलयचालकांवर अधिनियमातील तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या वैद्यकिय व्यावसायिकांनी जैव वैद्यकिय कचरा निर्मुलन नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहित फी भरुन नोंदणी प्रमाणपत्र, नुतनीकरण प्रमाणपत्र घेणेची कार्यवाही पुर्ण करुन घ्यावी. अन्यथा पुढील कार्यवाहीस आपण स्वत: जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग मार्फत करण्यात आले आहे