कोल्हापूर :- सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज सावित्रीबाई फुले रुग्णालय येथील त्यांच्या प्रतिमेस महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजीरी लाटकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव, पश्चिम देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, सहा.सचिव शिवाजी साळवी, उप-अभियंता सुरेश देशपांडे, नगरसेविका सौ.अिʉानी बारामते, उपआयुक्त धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रशासनाधिकारी डॉ.प्रकाश पावरा व डॉक्टर्स, सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता.