कोल्हापूर /प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. पाच पत्रकारांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व चौदा पत्रकारांना तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार रविवारी दि. १२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – निवास चौगले, प्रा भास्कर चंदनशिवे, संपादक विजय पवार ,जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार- बाळासाहेब चोपडे,जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार -जगन जामदार
तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारशिरोळ तालुका -जमिर मुजावर,हातकणंगले – अतुल मंडपे ,तानाजी पाटील,पन्हाळा तालुका -प्रकाश मोहरेकर, अरूण तळेकर,करवीर तालुका -अमर वरूटे,राधानगरी तालुका -गजानन संकपाळ,कागल तालुका – कृष्णात कोरे, अवधुत आठवले,गडहिंग्लज तालुका – प्रल्हाद माने,आजरा तालुकl -अमोल च०हाण,चंदगंड तालुका -विजय कांबळे
शाहुवाडी तालुका -सुभाष बोरगे,
भुदरगड तालुका -बाळासाहेब कवडे आदी पत्रकारांनी अभ्यासू लेखन केले असून सामाजिक समस्यांचा वेध घेऊन उच्चाटन केल्याबद्दल व पत्रकारांचे उत्कृष्ट संघटन बांधणी केल्याने त्यांची निवड संघाकडून केली आहे.
रविवारी दि. १२ जानेवारी रोजी राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पत्रकार संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशन कार्यक्रमांमध्ये त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी , कौन्सील मेंबर सुरेश कांबरे, जिल्हा संघटक प्रा. रवींद्र पाटील, प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब सकट यांनी प्रसिध्दीस दिली आहे.