कोल्हापूर /प्रतिनिधी
मध्यप्रदेश कॉंग्रेस सेवादलाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व निंदनीय लेख प्रसिद्धी केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेस पार्टीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन कॉंग्रेस पार्टीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. कॉंग्रेस पक्षाचा धिक्कार असो, ब्रिटीशांची हुजरेगिरी कॉंग्रेस पार्टीचा धिक्कार असो, वीर सावरकर अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कॉंगेस विरोधातील निषेधाचे फलक यावेळी दाखवण्यात आले.
भाजपा सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रास्ताविक करून मध्यप्रदेश कॉंग्रेस सेवादलाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय वाईट टिप्पणी करणारी पुस्तके वाटली त्या मजकुरा बद्दल तीव्र शब्दात निषेध केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, भारत देशासाठी अनेक राष्ट्र पुरुषांनी त्याग, बलिदान दिले आहे त्यामध्ये सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा राष्ट्रभक्त स्वातंत्र्य वीर सारवर यांच्याबद्दल कॉंग्रेस सेवादलाच्या शिबिरामध्ये वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह विधाने मांडली गेली आहेत ही बाबत अतिशय निंदनीय आहे. सावरकरां सारख्या राष्ट्रभक्तांबद्दल आदर व्यक्त करता आला नाही तर किमान त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची टीका करणे बंद करावे. यापुढे संपूर्ण देशामध्ये कोणत्याही राष्ट्र पुरुषाचा अवमान झाला तर हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरावा अशी मागणी केली गेली पाहिजे. इतक्या वर्षानंतर कोणताही मुद्दा नसल्याने हे कॉंग्रेस सरकार, राहूल गांधी अशा पद्धतीच्या चुकीच्या टीका करत आहेत. समस्त कॉंग्रेस वासिय हे आजकाल भारत देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, जे राष्ट्रभक्त देशाचे प्रतिक आहेत अशा महापुरूषांच्या विरोधात अपशब्द वापरून, खोटे साहित्य निर्माण करून देशभरात त्यांच्याविषयी अप- प्रचार करत असून हाच त्यांचा अजेंडा आहे. कॉंगेस पार्टी व कॉंग्रेस नेते सध्या अपप्रचाराचा अजेंडा वापरून देशामध्ये, समाजामध्ये अराजकता माजवून वोट बँक खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार त्यांचे हे सर्व प्रयत्न फोल ठरवत आहे. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी नागरिकता संशोधन कायदा (CAA) समर्थनार्थ भाजपा केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशवासियांना केलेल्या आवाहाना प्रमाणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील जास्तीत जास्त लोकांना ८८६६२८८६६२ या टोल फ्री नंबरवर मिस कॉल देण्याचे आवाहन करावे असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, कॉंग्रेस व त्यांच्या बगल बच्चांना अलीकडच्या काळामध्ये सावरकर साखरे का दिसू लागेलत हा प्रश्न पडतो. ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना वाघाचे काळीज असल्याचे धैर्य दाखवून समुद्रामध्ये उडी घेतली त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे खालच्या दर्जावर जाऊन केलेले लिखाणातून कॉंग्रेसची नपुसकांसारखी भावना दिसत आहे. गेली ५ वर्षे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशवासियांची मने जिंकली आहेत. कॉंगेसला आता २०२४ च्या इलेक्शनची भीती वाटत असून त्यामुळेच हे कॉंग्रेस नेते व कॉंग्रेस भारतीय जनता पार्टीच्या बलस्थान व देशाच्या अशा महान, आदर्श पुरुषांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक म्हणाले, मध्यप्रदेश कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या ५ वर्षामध्ये अतिशय लोकप्रिय निर्णय देशाच्या नागरिकांच्यासाठी घेतले आहेत. अनेक कायदे लोकांच्यासाठी बनवून लोकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. २०१९ साली निवडून आल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ज्या घोषणा केल्या होत्या त्याप्रमाणे पहिल्याच अधिवेशनामध्ये ३० दिवसांच्या आत काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचे धाडस पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व अमित शहा यांनी केले आहे.
अनेक लोकप्रिय निर्णय होत आहेत ज्यामध्ये जमीन अधिग्रहन, मोटर व्हेइकल, नागरिकता संशोधन कायदा (CAA) अशा निर्णयांचे देशभरात स्वागत होत आहे. त्यामुळे कॉंगेस नेत्यांना कोणताही मुद्दा उपस्थित करता येत नसल्याने त्यांनी असे उद्योग सुरु केले आहेत. देशामध्ये विविध समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी असे प्रसंग, लिखाण त्यांच्याकडून सुरु आहेत. CCA बाबत अल्पसंख्यांक लोकांच्या भावना भडकवण्याचे काम सुरु आहे. यामुळे देशभरात अनेक मोर्चे निघून करोडो रुपयांचे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान यामध्ये झाले आहे. कॉंग्रेस वृत्ती आज लोकांच्यामध्ये विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. त्याचबरोबर मध्येप्रदेशचे मुख्यमंत्री व राहूल गांधी यांनी या सर्व घडलेल्या प्रकारचा जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, नगरसेक विजय खाडे, अॅड.संपतराव पवार, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, मामा कोळवणकर, हर्षद कुंभोजकर, अनिल काटकर, प्रवीण शिंदे, मंडल अध्यक्ष भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, डॉ.राजवर्धन, संतोष माळी, विद्या बनछोडे, प्रज्ञा मालंडकर, चिनार गाताडे, विद्या बागडी, स्वाती तेली, आशा रेणके, छाया शिंदे, गायत्री, राऊत, सुलभा मुजूमदार, कविता पाटील, रजनी भुर्के, शोभा कोळी, शोभा भोसले, स्वाती कदम, आसावरी जुगदार, सुजाता पाटील, सयाजी आळवेकर, प्रसाद मुजुमदार, संजय साने, संतोष लाड, विशाल शिराळकर, रविंद्र घाटगे, सचिन जाधव, निलेश आजगांवकर, दिलीप बोंद्रे, प्रग्नेश हम्लाई, अशोक लोहार, सुशांत पाटील, साजन माने, दिग्विजय कालेकर, गिरीष साळोखे, प्रसाद मोहिते, राहूल पाटील, अक्षय निरोखेकर, राजू माळगे, अमित शिंदे, सिद्धांत भेंडवडे, अतुल चव्हाण, सुनीलसिंह चव्हाण, बापू राणे, संजय जासूद, धीरज पाटील, मनोज इंगळे, प्रशांत खोत, किरण कुलकर्णी, प्रमोद पोवार, प्रदीप माने, प्राची कुलकर्णी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते